महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यशाळा
महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यशाळा

महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कार्यशाळा

sakal_logo
By

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिलांसाठी उद्योजकता विकास व सक्षमीकरण यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलापूरचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले व प्रियांका दामले यांच्या सहकार्यातून बदलापूर पश्चिम बेलवली येथील यशस्विनी भवन येथे दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एवं विकास बोर्डाच्या वतीने ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत वेगवेगळ्या कल्याणकारी योजना, शासकीय योजना यांची माहिती उपस्थित महिलांना व बचत गटाच्या प्रतिनिधींना देण्यात आली. वर्कर्स एज्युकेशन बोर्डाचे विभागीय प्रमुख योगेश चट्टी व एम. पी. सिंग यांनी या वेळी महिलांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रियांका दामले, हर्षाली गायकवाड, प्राची थिटे, चंद्रशेखर जगताप, बाळकृष्ण नाटेकर, यांच्यासह अनेक महिला पदाधिकारीदेखील उपस्थित होत्या.