झिडके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी करुणा पाटील बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झिडके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी करुणा पाटील बिनविरोध
झिडके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी करुणा पाटील बिनविरोध

झिडके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी करुणा पाटील बिनविरोध

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील झिडके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी करुणा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी आनंद साजरा केला.
झिडके ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन घाटाळ यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती रवीना जाधव व रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. झिडके ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप पाटील यांनी सामंजस्यपणे ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत झिडके कार्यालयात निवडणूक घेण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करुणा पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज देण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन घाटाळ यांनी करुणा पाटील यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड जाहीर केली.
याप्रसंगी झिडके ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राम विघ्ने, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, छोटू धौंडी, योगिनी हरने, दीपिका भोईर, प्रभावती जाधव यासह येथील ज्येष्ठ कार्यकर्ते डी. एस. पाटील, दिनकर पाटील, प्रसाद पाटील, महेश पाटील, आशीष गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.