परतीच्या पावसाने भात पीक आडवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परतीच्या पावसाने भात पीक आडवे
परतीच्या पावसाने भात पीक आडवे

परतीच्या पावसाने भात पीक आडवे

sakal_logo
By

मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : गेल्या दोन दिवसांत सकाळ-संध्याकाळ मुरबाड परिसरात पडलेला धुवाधार पाऊस व जोरदार वाऱ्याने शेतात तयार झालेले पीक आडवे पडले आहे. हातातोंडाशी आलेले पिवळे सोने पाण्यात आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
मुरबाड तालुक्यातील बहुतांश शेतकरी फक्त पावसाळी भात पिकाच्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करतात. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त पाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या भात पिकाचा विमा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर नुकसान सोसावे लागणार आहे. तयार झालेले भात पीक शेतातील पाण्यात पडल्याने भात व पेंढा कुजून जाणार आहे. गुरांच्या वैरणीसाठी वापरला जाणारा सुका पेंढा काळा पडल्याने तो निरुपयोगी ठरणार आहे. पाण्यात पडल्याने काही भात कुजून त्याला शेतातच कोंब फुटणार आहेत. त्यामुळे काळे दाणे पडलेल्या व कोंब फुटलेल्या भाताची खरेदी शासन करत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

मागच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी भाताचे भारे साठवण्यासाठी खळी तयार करून ठेवली आहेत, पण पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी कापणी केलेली नाही. शुक्रवारी जोराच्या पावसाने पिके आडवी पडली. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- शंकर कोर, माजी सरपंच, आसोळे