भात खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भात खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ
भात खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ

भात खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ

sakal_logo
By

मुरबाड, ता. १५ (बातमीदार) : खरीप पणन हंगाम आधारभूत भात खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत असलेली मुदत वाढवून ती २१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे; तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ अंतर्गत आधारभूत केंद्रावर भात खरेदी केली जाणार आहे. खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेतर्गंत धान व भरडधान्य (भात) खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता १५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली होती; परंतु सध्या शेतकरी नोंदणी पुरेशी झालेली नसल्याने शासनाने याकरिता मुदतवाढ दिली आहे. शेतकरी ऑनलाईन नोंदणीची मुदत २१ ऑक्टोबरपर्यंत वाढविली असल्याचे ठाणे जिल्हा पणन अधिकारी यांनी कळवले आहे.
ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी केलेली आहे, अशाच शेतकऱ्यांची नोंदणी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित ई-पीक पाहणी करून पणन महामंडळ कार्यालयीनअंतर्गत सहकारी संस्था केंद्रात नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पवार यांनी केले आहे.
कल्याण तालुका व मुरबाड तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रात मुरबाड तालुका सहकारी शेतकरी संघ मुरबाड व आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत भात खरेदी केले जाणार आहे; मात्र टोकावडे, धसई, माळ, शिरोशी, न्याहाडी भागात आदिवासी विकास विकास महामंडळाकडून अजूनही शेतकऱ्यांची आॕनलाईन नोंदणी सुरू नाही. तरी लवकरात लवकर नाव नोंदणी सुरू करावी, अशी मागणी मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी चेअरमन प्रकाश पवार यांनी व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ यांचेकडे केली आहे.