अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १५ (बातमीदार) ः शीव-पनवेल महामार्गावर महाराष्ट्र नगर येथील टी जंक्शनजवळ मंगळवारी (ता.११) अज्ञात वाहनाच्या धडकेत सोबान चौधरी या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याचा भाऊ साद चौधरी याने अज्ञात वाहनचालकाविरोधात गुरुवारी तक्रार केली असून मानखुर्द पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.
गोवंडीच्या लोटस कॉलनी परिसरात राहणारा सोबान मंगळवारी पहाटे शीव-पनवेल मार्गावर वाशीच्या दिशेला दुचाकीवरून प्रवास करत होता. त्यावेळी महाराष्ट्र नगर टी जंक्शनजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्याला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.