जीवनदीपच्या विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनदीपच्या विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सुवर्णपदक
जीवनदीपच्या विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सुवर्णपदक

जीवनदीपच्या विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सुवर्णपदक

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १५ (बातमीदार) : मुंबई विद्यापीठअंतर्गत मातोश्री विद्यापीठ नेरूळ येथे झालेल्या वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत जीवनदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. मानसी घरत ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक, उदय सिंग ५५ किलो गटात सुवर्णपदक, वैभव भोईर ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक, सानिधा मोरे ८९ किलो वजनी गटात निवड चाचणीत प्रथम, सिद्धार्थ कदम याची ९६ किलो वजनी गटात निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य डॉक्टर कारे व उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, क्रीडा शिक्षक प्राचार्य मोहनिश देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.