किल्लेबांधणी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्लेबांधणी स्पर्धा
किल्लेबांधणी स्पर्धा

किल्लेबांधणी स्पर्धा

sakal_logo
By

मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्या गिरिमित्र विभागातर्फे किल्ला प्रतिकृती बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी किल्ले बांधणी कार्यशाळा सोमवारी (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी सात वाजता सेवा संघाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे परीक्षण रविवारी (२३ ऑक्टोबर) केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे. पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (२९ ऑक्टोबर) संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहामध्ये होणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग होणाऱ्यांनी आपल्या सोसायटीत किंवा घराजवळ किल्ला प्रतिकृती बनवा व आकर्षक बक्षिसे जिंका, असे सेवा संघातर्फे जाहीर करण्यात आले आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर आहे. अधिक माहितीसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी सेवा संघाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा मोफत असून सर्व इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सेवा संघातर्फे सांगण्यात आले आहे.