गुरु नानक महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरु नानक महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन
गुरु नानक महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन

गुरु नानक महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन

sakal_logo
By

धारावी, ता. १५ (बातमीदार) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरु तेग बहाद्दूर नगर येथील गुरु नानक महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कलाम यांच्यावरील चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पुष्पिंदर कौर भाटिया यांनी कलाम यांचे शैक्षणिक विचार, या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागप्रमुख प्राध्यापक अनुराधा नामजोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. महाविद्यालात विविध दिन साजरे करून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते, अशी माहिती महाविद्यालयाचे राज्य शास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक सुमित खरात यांनी दिली.