भगवत गीता स्पर्धा डिसेंबरमध्‍ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगवत गीता स्पर्धा डिसेंबरमध्‍ये
भगवत गीता स्पर्धा डिसेंबरमध्‍ये

भगवत गीता स्पर्धा डिसेंबरमध्‍ये

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १५ (बातमीदार) : संस्कृत भाषा संस्था आणि अखिल भारतीय कीर्तन यांच्यातर्फे डोंबिवली, कल्याण आणि शहरातील इतर भागांमध्ये भगवत गीता स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार असून, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे मुलांचे उच्चार सुधारण्यास मदत होईल.
स्पर्धेसाठी प्रथम गट इयत्ता पहिली ते दुसरी दहा श्लोक, द्वितीय गट दुसरी ते चौथी पंधरा श्लोक, तृतीय गट पाचवी ते सातवी वीस श्लोक, चतुर्थ गट आठवी ते दहावी पंचवीस श्लोक आणि पाचवा खुला गट पंचवीस श्लोक असतील व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
गीतेचे श्लोक हे पाठांतर करून सलग व स्पष्ट बोलून दाखवायचे आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपला तपशील मराठीत लिहून केंद्रप्रमुखाकडे द्यावा, असे आवाहन संस्कृत भाषा संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा जोशी व उपाध्यक्ष उज्ज्वला पवार यांनी केले आहे.