डहाणू तालुक्यात २८९ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणू तालुक्यात २८९ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात
डहाणू तालुक्यात २८९ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात

डहाणू तालुक्यात २८९ उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात

sakal_logo
By

कासा, ता. १५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून शुक्रवारी संध्याकाळी प्रचाराची सांगता झाली. डहाणूत २८९ उमेदवार सरपंच पदासाठी, तर सदस्य पदासाठी १६४६ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १०८ उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसते, त्यामुळे विविध निशाणी घेऊन उमेदवार उभे आहेत. मतदारांना आपले चिन्ह आणि मत देण्याची पद्धत समजावणे खूप त्रासदायक ठरत आहे. ग्रामीण भागातील मतदार बहुतेक अशिक्षित असल्यामुळे या निवडणुकीत अनेक वॉर्डात एकूण चार मते द्यावी लागणार आहेत. त्यात विविध चिन्ह लक्षात ठेवणे खूप कठीण आहे. या निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर, बॅनर, पत्रक वापरण्यात आले आहेत.