निखिलला नोकरी देण्याचा प्रयत्न करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निखिलला नोकरी देण्याचा प्रयत्न करू
निखिलला नोकरी देण्याचा प्रयत्न करू

निखिलला नोकरी देण्याचा प्रयत्न करू

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा निखिल दुबे याला कायमस्वरूपी नोकरी मिळावी, यासाठी केंद्र सरकार स्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन कांदिवली (पू.) चे आमदार अतुल भातखळकर यांनी दिले.
कांदिवलीच्या पोईसर विभागात राहणाऱ्या निखिलचा शुक्रवारी भातखळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामान्य कुटुंबातील निखिल दुबे याला भविष्यात ऑलिंपिकमध्ये सहभागी होता यावे, यासाठीही आपण सर्वतोपरी साह्य करू असेही ते म्हणाले. त्यासाठी त्याची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट घडवून देणार आहेत. राज्य सरकारकडून त्याला आवश्यक असणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय केंद्र सरकार स्तरावरही प्रयत्न करून त्याला कायम नोकरी व घर मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही भातखळकर म्हणाले. निखिल याने नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.