कलात्मक पणत्यांना मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलात्मक पणत्यांना मागणी
कलात्मक पणत्यांना मागणी

कलात्मक पणत्यांना मागणी

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : नक्षीदार आकाश कंदिलांप्रमाणेच कलात्मक पणत्या बाजारात विक्रीसाठी आल्या असून त्यांना मागणी वाढत आहे. लाल मातीच्या पारंपरिक पणत्यांच्या गर्दीत कलाकुसरीने सजवलेल्या, नक्षीकाम केलेल्या विविध प्रकारच्या पणत्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे होत असल्यामुळे यंदा सर्वसामान्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिव्यांचा सण असलेल्या दीपावलीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत; पण यावर्षी पणत्यांचे भाव दोन ते तीन टक्क्यांनी वाढले आहेत. लाल मातीपासून बनवलेल्या साध्या मध्यम आकाराच्या पणत्या १२० रुपये डझन, छोट्या पणत्या ६० ते ७० रुपये डझन, तर मोठ्या आकाराच्या पणत्या २०० रुपयांना दोन नगप्रमाणे मिळत आहेत.

बारीक नक्षीकाम केलेल्या, मोत्याची सजावट असलेल्या पणत्यांना जास्त मागणी आहे. रंगकाम केलेल्या तसेच लाल मातीच्या पारंपरिक पणत्या, मेणाच्या, चार पाकळी फुलाच्या आकाराच्या पणत्या, उभा दीपस्तंभ, मटका अशा अनेक पणत्या सध्या ठाण्याच्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत.
--------------------------
लाल मातीच्या नक्षीकाम असणाऱ्या पणत्या
मध्यम आकाराच्या- १२० रुपये डझन (एक पणती १५ ते २० रुपये)
छोट्या ६० रुपये डझन- (एक पणती ६ ते १० रुपये)
मोत्याच्या नक्षीकाम केलेल्या सांगाड्यातील मेणाच्या पणत्या- २०० रुपये जोडी

रंगीत मातीच्या पणत्या- १५० रुपये
मध्यम आकाराच्या चार पणत्या- १२० ते १०० रुपये
छोट्या चार पणत्या- ३०० रुपये