पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना
पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना

पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्रे रवाना

sakal_logo
By

मोखाडा, ता. १५ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यात आज २२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मोखाडा तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्रे व साहित्य पोलिस बंदोबस्तात ७८ मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे.
मोखाड्यातील २२ ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मोखाड्यात २२ सरपंच पदांसाठी १०३, तर १६७ सदस्य पदासाठी ४३५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत २१ हजार ५६५ पुरुष, तसेच २० हजार ६४८ स्त्री मतदार असे एकूण ४२ हजार २१३ मतदार आहेत. ७८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी ४३० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी १० पोलिस अधिकाऱ्यांसह १३५ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १५) मोखाडा तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्रे व साहित्य सर्व मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आले आहे.

मोखाडा : मोखाडा तहसीलदार कार्यालयातून पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्रे घेऊन जाताना कर्मचारी.