जितेंद्र न्यू ईव्ही टेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जितेंद्र न्यू ईव्ही टेक
जितेंद्र न्यू ईव्ही टेक

जितेंद्र न्यू ईव्ही टेक

sakal_logo
By

ई-वाहनांसाठी घरच चार्जिंग स्टेशन
जितेंद्र न्यू ईव्ही टेकचे सहसंस्थापक शाह यांचा विश्‍वास

मुंबई, ता. १८ : औद्योगिकीकरणात पुढारलेल्या महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळाल्यानंतर आता देशपातळीवर क्रांती करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आपल्या देशात इलेक्ट्रिक दुचाकीसाठी स्वतंत्र पायाभूत सुविधांची आवश्‍यकता नाही. कारण प्रत्येक घरच हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आहे. त्यामुळे काही महिन्यांत देशात ई-दुचाकींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्‍वास जितेंद्र न्यू ईव्ही टेक प्रा. लिमिटेडचे सहसंस्थापक समंकित शाह यांनी व्यक्त केले.

भारतीयांसाठी इलेक्ट्रिक वाहन ही संकल्पना काही नवी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर अत्यल्प प्रमाणात होत होता; मात्र नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती, सरकारकडून अनुदान आणि कंपन्यांकडून बदलत्या रणनीतीमुळे इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावताना दिसत आहेत. आपल्या देशामध्ये चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकींना अधिक पसंती दिली जाते. सामान्य ग्राहकांपर्यंत इलेक्ट्रिक वाहने पोहोचण्यासाठी नाशिकमध्ये २०१४ मध्ये कंपनीची स्थापना सुरू करण्यात आली. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत २०१६ मध्ये दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या उत्पादनाला सुरुवात झाली. विदेशातून सुटे भाग आयात करण्यापेक्षा आपल्या देशातच उत्पादन आणि संशोधनाच्या मोठ्या संधी असल्याने कंपनीने स्थानिक पातळीवरून त्याची मागणी करत रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन दिल्याचे शाह यांनी सांगितले.

सध्या कंपनीकडून वर्षाला सुमारे १५ हजार दुचाकींचे उत्पादन करत शंभर जणांना रोजगार मिळतो. २०२७ पर्यंत उत्पादन क्षमता वाढवत प्रतिवर्षी विक्री १० लाख वाहनांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. सध्या १४ राज्यातील १२० शहरांमध्ये कंपनीच्या दुचाकींची डिलर्समार्फत विक्री करण्यात येते. कारखान्याच्या विस्तारासाठी ३०० कोटींपर्यंत भांडवल उभारण्याचा प्रयत्न असल्याचे शाह यांनी सांगितले.

केवळ १५ मिनिटात दुचाकी चार्जिंग
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगसाठी जास्त वेळ लागत असल्याची ग्राहकांची तक्रार असते; मात्र लॉग९ या कंपनीबरोबर भागीदारी केल्याने केवळ १५ मिनिटांमध्ये दुचाकी चार्जिंग करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कमीत कमी वेळात दुचाकी चार्ज करणारी कंपनी ठरणार असल्याचा दावा शाह यांनी केला.