Mumbai अंधेरी पोटनिवडणकीदिवशी सार्जवनिक सुटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
अंधेरी पोटनिवडणकीदिवशी सार्जवनिक सुटी

Mumbai : अंधेरी पोटनिवडणकी दिवशी सार्जवनिक सुटी


मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी १६६ - अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील, त्यांनादेखील लागू आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल, प्रवीण कोया आणि सत्यजित मंडल यांनी कामांचा आढावा घेतला. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत तिन्ही केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील कार्यवाहीची माहिती निवडणूक निरीक्षकांना दिली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी अजित साखरे आणि निवडणूक विषयक कार्यदायित्वे सोपवण्यात आलेले समन्वय अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.