मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ११ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ११ लाखांची फसवणूक
मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ११ लाखांची फसवणूक

मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ११ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १५ (बातमीदार) : मेडिकल कॉलेजला प्रवेश घेऊन देतो, असे सांगत विरारमध्ये एका तरुणाला ११ लाखाचा गंडा घातला असल्याची घटना उघड झाली आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
तेजस पाटील (वय २०) असे फसवणूक झालेल्या विद्यार्थाचे नाव असून तो विरारच्या नारंगी गावाचा रहिवासी आहे. जय पाटील (वय २०), सुधांशू चौबे (वय ३२) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नावे आहेत. या दोन आरोपींनी मेडिकल कॉलेज ॲडमिशन करून देतो, असे सांगून तेजस पाटील या तरुणाकडून ११ लाख रुपये उकळले. एवढे पैसे देऊनसुद्धा ॲडमिशन होत नाही, आरोपीला विचारपूस केली, तर त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित मुलाने विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.