राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूया
राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूया

राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूया

sakal_logo
By

पनवेल, ता. १५ : देशभरात अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे. देशात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकला. यामुळे यावर्षीची दिवाळीही तितकीच विशेष आहे. यानिमित्त पनवेल शहरात आयएनएस विक्रांतची प्रतिकृती ओरियन मॉलमध्ये उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उद्‍घाटन पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शनिवारी (ता. १५) करण्यात आले
भारताच्या ऐतिहासिक युद्धात आयएनएस विक्रांतची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. भारताची पहिली युद्धनौका म्हणून ओळख असलेल्या या युद्धनौकेच्या चलचित्रांचे प्रदर्शन ओरियन मॉलमध्ये भरविण्यात आले आहे. संस्कारभारती, ओरियन मॉल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण दिवाळीमध्ये हे प्रदर्शन पनवेलकरांना पाहता येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ''चला...दिपावलीचा आनंद द्विगुणित करुया, मनामनातील दीप उजळूया, राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूया'' या घोषवाक्याच्या आधारे आयएनएसची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पनवेलकरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ओरियन मॉलचे मालक मनन परुळेकर आणि मंगेश परुळेकर यांनी केले आहे. यानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी मुंबई व रायगड विभागातील महाव्यवस्थापक अपर्णा जोगळेकर उपस्थित होत्या.