समता मधील विद्यार्थ्यांनी वाचली पुस्तके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समता मधील विद्यार्थ्यांनी वाचली पुस्तके
समता मधील विद्यार्थ्यांनी वाचली पुस्तके

समता मधील विद्यार्थ्यांनी वाचली पुस्तके

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी देशात वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. आज विविध ठिकाणी हा दिवस वेगवेगळ्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना पुष्पहार अर्पण केले. तसेच शाळेतील ग्रंथालयात हजेरी लावून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पसंतीच्या पुस्तकांचे वाचन केले. शाळेचे कार्याध्यक्ष राजेश सुभेदार यांच्या संकल्पनेतून आजचा वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.