दिवाळीच्या तोंडावर सुकामेवा महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीच्या तोंडावर सुकामेवा महागला
दिवाळीच्या तोंडावर सुकामेवा महागला

दिवाळीच्या तोंडावर सुकामेवा महागला

sakal_logo
By

वाशी, ता. १६ (बातमीदार) ः मराठी सणांपैकी उत्साहाचे प्रतीक असलेल्या दीपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच दोन वर्ष ठप्प झालेली सुक्या मेव्याची मागणी यंदा वाढल्याने खारीक, पिस्ता प्रतिकिलो १०० रुपयांनी महागला आहे.
ृदिवाळीत घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या, तसेच रेडीमेड फराळामध्ये तसेच बाजारातील मिठाईमध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, पिस्ता, किसमिस आणि खारीक याचा वापर केला जातो. अनेक जण हा सुका मेवा आपल्या आप्तेष्टांना तर शासकीय, खासगी कंपन्यांकडून कर्मचारी वर्गाला भेट म्हणून दिला जातो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत भेटवस्तू म्हणून सुका मेवा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सुका मेव्याला तेवढी मागणी नव्हती. मात्र, यंदा दिवाळीच्या अनुषंगाने सुका मेव्याला मागणी वाढली असताना महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
-------------------------------------------
सुक्या मेव्यातील मनुका, पिस्ता आणि खारीक या पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. बदाम, काजूचे दर स्थिर आहेत, मात्र पिस्ता आणि खारीकच्या दरात प्रतिकिलो १०० रुपयांची वाढ झाली आहे.
- हर्षद देढिया, व्यापारी
-----------------------------------------
सुका मेवा ः सध्याचे दर (रुपयांमध्ये)
मनुका ः २५० - ६५०
पिस्ता ः १००० - ११००
खारीक ः २५० -३५०