इंटकच्या दोन्ही गटांच्या सवलती रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंटकच्या दोन्ही गटांच्या सवलती रद्द
इंटकच्या दोन्ही गटांच्या सवलती रद्द

इंटकच्या दोन्ही गटांच्या सवलती रद्द

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस संलग्न असलेल्या महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक या एका संघटनेवर दोघांनी दावा केला असून आपलीच संघटना अधिकृत असल्याचे पत्र एसटी महामंडळ प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने अधिकृत संघटना ठरवण्याचे अधिकार महामंडळाला नसून जोपर्यंत अधिकृत संघटना ठरत नाही, तोपर्यंत दोन्ही गटांना राज्यभरात देण्यात येणाऱ्या सवलती काढून घेण्याच्या सूचना राज्याच्या विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या.
इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षांना काढल्याचा दावा तिगोटे यांनी केला; तर दुसरीकडे छाजेड यांनीच उलट तिगोटे यांना संघंटनेतून काढल्याचा दावा केल्याने दोघांमधील अधिकृत संघटना कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जोपर्यंत अधिकृत इंटक संघटना सिद्ध होत नाही, तोपर्यंत दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांना एसटी प्रशासनामार्फेत देण्यात येणाऱ्या सवलती रद्द करण्याचे आदेश कर्मचारीवर्ग व औद्योगिक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत. यासंदर्भात छाजेड यांना विचारले असता, नियमाप्रमाणे जे होईल ते होईल, असे सांगितले आहे; तर शेवटी दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे मुकेश तिगोटे यांनी सांगितले.