दादरमध्ये हिमालयान ध्यान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादरमध्ये हिमालयान ध्यान शिबिर
दादरमध्ये हिमालयान ध्यान शिबिर

दादरमध्ये हिमालयान ध्यान शिबिर

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः हिमालयान ध्यान हा ध्यानाचा ८०० वर्षांपासून चालत आलेला संस्कार असून तो हिमालयातील गुफांमध्ये विकसित झाला आहे. परमपूज्य श्री शिवाकृपानंद स्वामीजी यांनी तो १९९४ मध्ये समाजात आणला. तेव्हापासून आजपर्यंत ध्यानाचा हा संस्कार भारतासहित जगातील ६५ देशांतील लोकांनी आपलासा केला आहे. दादरमध्ये याबाबत माहिती देणारे हिमालयान ध्यान शिबिर शनिवारी (ता. १५) पार पडले.
श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन व गुरुतत्त्व मंचाद्वारा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिमालयातील सद्गुरु महर्षी श्री शिवकृपानंद स्वामीजीद्वारा संचलित हिमालय ध्यानाचे भव्य दर्शन शिबिर योगी सभागृह दादर पूर्व येथे १५ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते १०.३० यादरम्यान झाले. या कार्यक्रमासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच पुणे महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर अजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी चार हजारपेक्षा अधिक साधक उपस्थित होते. हजारो लोकांनी गुरुतत्त्व या यूट्युब चॅनलवर हा कार्यक्रम पाहिला.
हा संस्कार कोणत्याही जाती, धर्म,भाषा, लिंग, देशाच्या सीमांच्या पलीकडे जाऊन समस्त मनुष्यतेसाठी आहे. योगी सभागृहात झालेल्या दर्शन शिबिराचा लाभ मुंबई आणि भारतातील विभिन्न प्रदेशांतून आलल्या अनेक पाहुण्यांनी घेतला. या शिबिरात स्वामिजींनी समग्र योगाची माहिती देताना स्पष्ट केले, की योगासनच योग नाही तर अष्टांग योगाचा योगासन हा एक फक्त भाग आहे. समग्र योगातून मनुष्याचा आभामंडळ विकसित होऊन वैचारिक प्रदूषणापासून त्याचे सुरक्षा कवच प्राप्त करता यावे इथपर्यंत योगाचे क्षेत्र विशाल आहे.
...
ध्यानाचे महत्त्‍व
आपल्या प्रवचनात स्वामिजींनी नियमित ध्यानाचे महत्त्व सांगितले आणि हिमालयान ध्यानाच्या आश्रमांमध्ये निर्मित होत असलेल्या श्री गुरुशक्ती धामांचे निर्माण कार्याचे महत्त्व प्रतिपादित केले. सामान्यतः लहान मुलांपासून प्रत्येक वयाच्या व्यक्तीने ध्यान करणे किती महत्त्वपूर्ण आहे याची माहिती आपल्या सरळ शब्दांमध्ये आणि उदाहरणांसह स्वामिजींनी अतिशय चैतन्यपूर्ण भाषेत स्पष्ट केली.