Crime News : वॉर्डबॉय बनले बोगस सीबीआय अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
वॉर्डबॉय बनले बोगस सीबीआय अधिकारी

Crime News : वॉर्डबॉय बनले बोगस सीबीआय अधिकारी

मुंबई : दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणाऱ्या दोन इसमांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक आरोपींची नावे चैतन्य देसाई आणि राजीव वाल्मीकी अशी आहेत. आरोपींनी मुंबईतील ताडदेव परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाची सीबीआय अधिकारी अशी ओळख सांगत फसवणूक करून त्याची १० लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावली होती. चोरीची रोकड जप्त करण्यात आली असून पोलिस अधिक चौकशी करत आहेत.