भिवंडीतील डॉ. सुप्रिया अरवारी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीतील डॉ. सुप्रिया अरवारी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
भिवंडीतील डॉ. सुप्रिया अरवारी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

भिवंडीतील डॉ. सुप्रिया अरवारी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

sakal_logo
By

भिवंडी, ता. १६ (बातमीदार) : वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत प्रसूती आणि स्त्री रोगतज्‍ज्ञ संघटनेच्या वतीने राज भवन येथील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते भिवंडी येथील प्रख्यात स्त्री-रोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुप्रिया अरवारी यांचा महिलांच्या आरोग्यासाठी उल्लेखनीय सेवेबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रसूती आणि स्त्री-रोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने महिला आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक प्रसूती तज्ज्ञ व स्त्री-रोग तज्ज्ञ डॉक्टरांचा राज्यपालांच्‍या हस्ते राज भवनावर सन्मान करण्यात आला होता. या प्रसंगी प्रसूती आणि स्त्री-रोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर, २०२२-२४ चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांसह असंख्य तज्‍ज्ञ डॉक्टर या प्रसंगी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते राज्यभरातील ३७ तज्ज्ञ डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. स्त्री-रोग व प्रसूती क्षेत्रात डॉ. सुप्रिया अरवारी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया अरवारी यांनी सुमधुर आवाजात केले. त्याचे खुद्द राज्यपालांनी कौतुक केले. या सन्मानाबद्दल भिवंडी शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी डॉ. अरवारी यांचे अभिनंदन केले आहे.