वनवासी प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वनवासी प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
वनवासी प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

वनवासी प्रदर्शनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

ठाणे, ता. १६ (बातमीदार) : वनवासी बांधवांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. आदिवासी समाजातील प्रसिद्ध तारपा नृत्याने प्रदर्शनाचा शुभारंभ करण्‍यात आला. ठाण्यात ब्राह्मण सेवा संघ, नौपाडा येथे वनवासी कल्याण आश्रमातर्फे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणू, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, माणगाव, येऊर, पंखाडा, पनवेल अशा अनेक आदिवासी पाड्यांतून आदिवासी बांधवांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी आणल्‍या आहेत. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, अखिल भारतीय वीकेए हितरक्षप्रमुख गिरीश कुबेर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शनात घरी बनवलेल्या खाद्य वस्तू, कापडावर केलेले सुबक असे वारली पेंटिग, बांबूपासून बनवलेल्या अनेक विविध वस्तू, आयुर्वेदिक औषधे, कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती, त्यावरील नक्षीकाम तसेच दिवाळीसाठी उपयुक्त दिवे, सजावटीच्या वस्तू अशा अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंच्या किमती साधारणपणे ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहेत. दर वर्षी प्रदर्शनासह जनजाती संबंधित विषय घेऊन आश्रम एक स्मरणिका प्रकाशित करतो. या वर्षीही जनजाती हितरक्ष व प्रदर्शनाचे रौप्यमहोत्‍सवी वर्ष या विषयावरील स्मरणिकेचे गिरीश कुबेर यांच्या हस्ते प्रकाशन करण्‍यात आले.