उल्हासनगरात सेंच्युरी कंपनीच्या क्रेडिट सोसायटीची निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात सेंच्युरी कंपनीच्या क्रेडिट सोसायटीची निवडणूक
उल्हासनगरात सेंच्युरी कंपनीच्या क्रेडिट सोसायटीची निवडणूक

उल्हासनगरात सेंच्युरी कंपनीच्या क्रेडिट सोसायटीची निवडणूक

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीमध्ये पार पडलेल्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत कामगार एकता पॅनेलने ११ पैकी १० जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला आहे. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ कामगार नेते आणि विजयी उमेदवारांनी जल्लोष करून आनंद साजरा केला.
दोन दिवसांपूर्वी सेंच्युरी रेयॉन क्रेडिट सोसायटीची निवडणूक पार पडली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्‍यानंतर ११ पैकी १० जागा कामगार एकता पॅनेलने जिंकल्या; तर परिवर्तन पॅनेलने अवघी एक जागा जिंकली. ‘सत्यमेव जयते’ या पॅनेलला मात्र एकही जागा जिंकता आली नाही. कामगार एकता पॅनेलच्या विजयी उमेदवारांची नावे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, एकनाथ ओळेकर, सुरजभान लांबा, अरुण सिंग, सतीश दीक्षित, सी. पी. चव्हाण, शाम राजभोज, राजेश भोईर, संजय पोतदार, स्वाती यशवंतराव असून परिवर्तन पॅनेलच्या वर्षा इंगळे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या इतिहासात एखाद्या पॅनेलने एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळविल्याची ही पहिलीच घटना आहे. कामगारांचे हित लक्षात घेऊन कोणतेही राजकारण न करता कामगारांनी मतदान केल्याने हा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया कामगार नेते मोहन कंडारे यांनी दिली आहे. विजयी उमेदवारांचे कामगार नेते समर्थक संतोष भोईर, अनिल पाटील, राजकुमार पारीख, मोहन कंडारे, माजी नगरसेवक राजू कंडारे, संतोष पांडे आदींनी प्रवेशद्वारावर जल्लोषात स्वागत करून अभिनंदन केले आहे.