ब्रह्माकुमारी तर्फे सफाई कामगारांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रह्माकुमारी तर्फे सफाई कामगारांचा सन्मान
ब्रह्माकुमारी तर्फे सफाई कामगारांचा सन्मान

ब्रह्माकुमारी तर्फे सफाई कामगारांचा सन्मान

sakal_logo
By

मुलुंड, ता. १६ (बातमीदार) ः ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्‍या मुलुंड पूर्व शाखेतर्फे सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे हा सन्मान सोहळा ब्रह्माकुमारी मुलुंड पूर्व तर्फे २७ सप्टेंबरपासून सुरू असून पुढील एक महिन्यापर्यंत तो सुरू राहणार आहे. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने दर आठवड्याला ३० सफाई कामगारांचा सत्कार ब्रह्माकुमारीतर्फे केला जातो. या उपक्रमाबद्दल माहिती देताना ब्रह्माकुमारी छायाबेन म्हणाल्या की, ‘आम्ही दरवर्षी अनेक सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रम राबवित असतो. यंदाचे वर्ष आझादी का अमृत महोत्सवाचे वर्ष असल्यामुळे आम्ही विविध ठिकाणी समाजोपयोगी कार्य करत आहोत. याच अनुषंगाने आम्ही रस्त्यावर काम करणाऱ्या सफाई कामगारांना त्यांच्या योगदानाबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा सत्कार गेल्या एक महिन्‍यापासून करत आहोत. मुलुंड पूर्वेतील एकूण २२५ कामगारांचा सत्कार करण्याचा आमचा मानस आहे, असेही त्‍यांनी या वेळी सांगितले.