मंबईत कोविडरुग्णांमध्ये ३१ टकक्यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंबईत कोविडरुग्णांमध्ये ३१ टकक्यांनी वाढ
मंबईत कोविडरुग्णांमध्ये ३१ टकक्यांनी वाढ

मंबईत कोविडरुग्णांमध्ये ३१ टकक्यांनी वाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गेल्या १५ दिवसांत मुंबईत कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ६ ते १४ ऑक्टोबरदरम्यान १,३०५ रुग्ण नोंदले गेले आहेत. शिवाय, गेल्या पाच दिवसांत दररोज सरासरी १० लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मुंबई आणि ठाणेवगळता राज्यात कोविडची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना कोविड संसर्गामध्ये किंचित वाढ होण्याची अपेक्षा होती. ज्यामुळे त्यांनी इन्फ्लुएंझा आजार आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (सारी) असलेल्या रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. ज्यात चाचणी, ट्रेसिंग आणि उपचार यावर लक्ष केंद्रित केले गेले. आम्ही सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना त्रिसूत्री सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संशयित कोविड किंवा आयएलआय आणि सारी रुग्णांचा शोध घेण्याचे आणि पॉझिटिव्ह केसेसचे नमुने गोळा करून संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत राज्य निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, नवरात्रीनंतर लोकांची ये-जा असते. त्यामुळे थोडीशी वर्दळ सुरू झाली आहे. शिवाय, ओमिक्रॉनच्या सर्व नवीन प्रकारांप्रमाणे, व्हायरसचा प्रसार दर थोड्या काळासाठी वाढेल. दरम्यान, त्यातून फार धोका उद्भवणार नाही. दिवाळी जवळ आल्याने आम्ही नागरिकांना सावधगिरी बाळगावी, असा इशारा दिला आहे. शिवाय, त्यांनी सुरक्षेचे नियम पाळावेत. जसे की सार्वजनिक ठिकाणी कोविडयोग्य वर्तन पाळणे आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण करणे. कॉमोरबिडीटी असलेले लोक, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या आणि फ्ल्यूसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्यांनी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी असताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.