केडीएमटीच्या नियंत्रकाला रिक्षाचालकांची मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीएमटीच्या नियंत्रकाला रिक्षाचालकांची मारहाण
केडीएमटीच्या नियंत्रकाला रिक्षाचालकांची मारहाण

केडीएमटीच्या नियंत्रकाला रिक्षाचालकांची मारहाण

sakal_logo
By

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : कल्याण एसटी डेपोमध्ये केडीएमटी आणि एनएमएमटी बसेसला १५ ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली आहे. या बसेस प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबत असल्याने त्याचा मनात राग धरून काही रिक्षाचालकांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता केडीएमटीचे नियंत्रक भानुदास यादव (५०) यांच्यासहित अन्य कर्मचारी वर्गाला दम दिला. शिवाय एसटी डेपोमध्ये तुमच्या गाड्या लागतात ना, बाहेर का लावता, अशी हुज्जत घालून मारहाण केल्याने काही काळ तणाव होता. याबाबत महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केल्याची माहिती केडीएमटी उपव्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली. मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होईल, असे भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र रिक्षाचालकांची दादागिरी पुन्हा समोर आली असून याबाबत सरकारी यंत्रणा काय करणार याकडे लक्ष लागले आहे.