सकाळ वाचन प्रेरणा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ वाचन प्रेरणा दिवस
सकाळ वाचन प्रेरणा दिवस

सकाळ वाचन प्रेरणा दिवस

sakal_logo
By

विद्यार्थी रंगले वाचन सोहळ्यात!
‘सकाळ’ एनआयई अंकाचे शाळांमध्ये सामूहिक वाचन


मुंबई, ता. १६ ः भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) दरवर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘सकाळ’ही त्यानिमित्त विविध शाळांमध्‍ये विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवत असते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनानिमित्त साध्य करण्याचा प्रयत्न ‘सकाळ’च्या माध्यमातून करण्यात येत असतो. विद्यार्थी व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने ‘सकाळ’ एनआयई अंकाच्‍या सामूहिक वाचनाचा उपक्रम यंदा हाती घेण्यात आला. मुंबईतील अनेक शाळांनी त्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले.
दरम्‍यान, बोरिवली येथील अभिनव विद्यामंदिरच्‍या मुख्याध्यापिका प्राची वालकर यांनी उपक्रमात पालकांना सहभाग करून घेतले. याप्रसंगी त्‍यांनी शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी वाचनालयही सुरू केले.

सहभागी झालेल्या शाळा
‘सकाळ’ एनआयई अंकाच्‍या सामूहिक वाचन कार्यक्रमात अनेक शाळांनी सहभाग दर्शवला. अभिनव विद्यामंदिर (बोरिवली), योजना विद्यालय (बोरिवली), डॉ. एन. डी. पाटील प्राथमिक विद्यालय (चारकोप), शारदाश्रम विद्यामंदिर (दादर), अस्मिता विद्यालय (जोगेश्वरी), प्रतीक्षा नगर पालिका शाळा, इंडियन एज्युकेशन सोसायटी प्राथमिक मराठी (वांद्रे),
इंडियन एज्युकेशन सोसायटी (आयईएस) पाटकर गुरुजी विद्यालय (दादर), अभ्युदय एज्युकेशन (काळाचौकी), सेवा सदन हायस्कूल (गिरगाव), ॲफेक हायस्कूल (चेंबूर), गोखले एज्‍युकेशन सोसायटीचे परळ केंद्र, मराठी प्राथमिक बालविकास विद्यामंदिर (जोगेश्वरी), जिजामाता विद्यामंदिर (मालाड), भैरव विद्यालय (घाटकोपर), विद्याभवन (घाटकोपर) इत्यादी शाळांनी ‘सकाळ’च्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी वाचनाच्या महत्त्वाविषयी कविता तयार करून ऐकवल्या. घोषवाक्य लिहिलेले फलक तयार केले. वाचनाचे महत्त्व या विषयावर निबंध लेखन केले. ‘दिसा माजी वाचावे काहीतरी’ या उक्तीप्रमाणे वाचनानंद सर्वांनी रोजच घेतला पाहिजे. वाचन प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी हा दिन रोजच साजरा करायला हवा, असे वाटते.
- स्नेहा कुळये, मुख्याध्यापिका, ॲफेक हायस्कूल, चेंबूर

वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘सकाळ’तर्फे एनआयई अंकाचे मुलांना वाटप करण्यात आले. अंकाचे वाचनही करून घेतले. त्यानिमित्त माहितीपूर्वक लेखन मुलांना वाचायला मिळाले. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.
- संगीता जोशी, मुख्याध्यापिका, योजना विद्यालय

वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून संघर्ष व संशोधन वृत्ती घ्यावी. ‘सकाळ’ वर्तमानपत्राच्या सामान्य ज्ञानावर आधारित एनआयई उपक्रमातून भविष्यातील शास्त्रज्ञ, सैन्यदल तसेच नागरी सेवेतील अधिकारी निर्माण व्हावेत.
- सुरक्षा शशांक घोसाळकर, चिटणीस, बालविकास विद्यामंदिर, जोगेश्वरी

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जंयती अर्थात वाचन प्रेरणा दिनानिमित्तच्या उपक्रमात पालकांना सामावून घेण्यात आले. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आधी ती पालकांमध्ये रुजवणे महत्त्वाचे आहे, हे त्‍या मागील उद्दिष्‍ट होते.
- प्राची वालकर, मुख्याध्यापिका, अभिनव विद्यामंदिर

अंकाचे सभासद
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून भैरव विद्यालय या शाळेतील विद्यार्थी ‘सकाळ’ एनआयई या बहुरंगी, अद्ययावत ज्ञानाने संपन्न अशा अंकाचे सभासद झाले आहेत. या उपक्रमासाठी भैरव परिवारातील संस्थाचालक, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून खूप शुभेच्छा.

विद्यार्थ्यांसाठी खास मेजवानी
वाचन, लेखन व संवाद कौशल्ये विकसित करणारा हा विद्यार्थीप्रिय उपक्रम यावर्षीसुद्धा विद्यालयात खास नवीन उपक्रमासह राबवा. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सभासदांना ‘सकाळ एनआयई’चे १८ अंक वर्षभरात मिळणार आहेत. सोबतच शालेय उपयोगी भेटवस्तू व शाळानिहाय कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. त्यामध्‍ये लोकशाहीचा चौथा स्तंभ, वर्तमानपत्र, तंत्रज्ञान, विज्ञान कार्यशाळा, आहार व आरोग्य यांसारख्या मनोरंजनातून ज्ञान देणाऱ्या कार्यशाळा होतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी मुंबई शहर संपर्क मनीष ढवण यांच्याशी ८८८८८ ४९०३० क्रमांकावर संपर्क साधता येईल.

-----