वोक्हार्ट रुग्णालयाचे कॅन्सर केअर सेंटर सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वोक्हार्ट रुग्णालयाचे कॅन्सर केअर सेंटर सुरु
वोक्हार्ट रुग्णालयाचे कॅन्सर केअर सेंटर सुरु

वोक्हार्ट रुग्णालयाचे कॅन्सर केअर सेंटर सुरु

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रुग्णालयाचे कॅन्सर केअर सेंटर सुरू झाले आहे. मुंबईतील स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजीच्या सहयोगाने हे सेंटर सुरू झाले असून कर्करुग्णांना याचा फायदा होणार आहे. भारतातील कर्करुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयात दर्जेदार व प्रतिबंधात्मक उपचार देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भारतातील नोंद झालेल्या कर्करुग्णांची संख्या यावर्षी १९ ते २० लाख एवढी असावी, असा अंदाज आहे; तर प्रत्यक्षात नोंद झालेल्या रुग्णांहून दीड ते तीन पटींनी अधिक कर्करुग्ण असावेत, असे फिक्की व ईवाय या संस्थांच्या अभ्यासातून पुढे आले आहे.

स्पेशालिटी सर्जिकल आँकोलॉजी डॉ. संकेत मेहता यांनी सांगितले की, मिनिमली इन्वेजिव शस्त्रक्रिया व रोबोटिक शस्त्रक्रियांसारखी नवीन शस्त्रक्रिया- तंत्रे पारंपरिक पद्धतींची जागा घेऊ लागली आहेत. विशिष्ट इंद्रियांवर उपचार करण्याच्या दृष्टीने उच्चप्रशिक्षित कर्करोग सर्जन्सनी स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजी हा समूह तयार केला आहे. ऑर्गन-स्पेसिफिक कर्करोग सर्जन्सची एक तज्ज्ञ टीम, उच्च दर्जाची संरचना, पूरक वैद्यकीय सेवा, आयसीयू बॅक-अप, अत्याधुनिक शस्त्रक्रिया दालने, भुलीची उपकरणे, शस्त्रक्रियेची साधने व उपकरणे यांच्या सहाय्याने जटिल कर्करोग शस्त्रक्रिया पार करतील.

वोक्हार्ट रुग्णालयाचे राज्य विभागाचे सीईओ डॉ. पराग रिंदानी यांनी सांगितले की, कर्करोगाचा प्रकार, कर्करोगाचा अवयवांवर झालेला परिणाम, आजारांची तीव्रता, परिणाम झालेल्या अवयवाचे आरोग्य, आजाराचा टप्पा, आजाराचे मेटास्टॅटिक (आजार कुठून कुठपर्यंत पसरला आहे), रुग्णाचे वय, रुग्णाचे शारीरिक आरोग्य, अन्य सहव्याधी, सहकार्य, उपचार परवडण्याजोगे असणे, किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीची भूमिका, त्यांचा निष्पत्तीशी संबंध असे अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. ऑर्गन-स्पेसिफिक कर्करोग उपचार हे विविध शाखांत काम करणाऱ्या डॉक्टरांद्वारे दिले जातील आणि यातून उच्च दर्जाचे उपचार देऊन रुग्णाला त्याचे आरोग्य पुन्हा मिळण्याची सर्वोत्तम संधी दिली जाईल.