बाजारपेठेमध्ये दिवाळीची खरेदी जोमाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारपेठेमध्ये दिवाळीची खरेदी जोमाने
बाजारपेठेमध्ये दिवाळीची खरेदी जोमाने

बाजारपेठेमध्ये दिवाळीची खरेदी जोमाने

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १६ (बातमीदार) : दिवाळी आठ दिवसांवर आली असताना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी गर्दी पाहावयास मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाने जोर धरला होता. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी कमी प्रमाणात गर्दी दिसत होती; परंतु पावसाने विश्रांती घेतल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी पाहावयास मिळाली. मोठ्या उत्साहाने लोक कंदील, पणत्या, रांगोळी खरेदी करत होते. तसेच इलेक्ट्रॉनिकच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली. यावर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्‍याचे दुकानदाराने सांगितले.

मागील काही दिवसांत रेडिमेड फराळाची बुकिंग ऑर्डरचे प्रमाण कमी झाले होते; परंतु आता पोळी-भाजी केंद्र, रेडिमेड फराळ विक्रेते, स्नॅक्स कॉर्नर या दुकानांमध्ये फराळाची ऑर्डर बुकिंग करण्यासाठी लोकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. तसेच कपड्यांच्या दुकानांतसुद्धा गर्दी पाहावयास मिळाली. किल्ला बनवण्यासाठी लागणारी माती, सैनिक, रांगोळी काढण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे साचे, तसेच वेगवेगळ्या आकाराचे कंदील, लायटिंग बाजारात विक्रीसाठी आले आहेत. या दरम्यान रविवारी पावसाने दडी मारल्यामुळे आणि सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी झाली, त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती.