‘कृष्ण माझा जीव’ गीताची सृजन संस्थेतर्फे निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कृष्ण माझा जीव’ गीताची सृजन संस्थेतर्फे निर्मिती
‘कृष्ण माझा जीव’ गीताची सृजन संस्थेतर्फे निर्मिती

‘कृष्ण माझा जीव’ गीताची सृजन संस्थेतर्फे निर्मिती

sakal_logo
By

विरार, ता. १६ (बातमीदार) : मराठी भावसंगीत, चित्रपट संगीत क्षेत्रातील अग्रणी गीतकार, जनकवी पी. सावळाराम यांनी १९५५ मध्ये लिहिलेल्या ‘कृष्ण माझा जीव’ या पहिल्या गीताची विरार येथील सृजन संस्थेने निर्मिती केली आहे.
गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?, लेक लाडकी या घरची, कल्पवृक्ष कन्येसाठी, जिथे सागरा धरणी मिळते, गंध फुलांचा गेला सांगून, गोड गोजिरी लाज लाजरी या आणि अशा अनेक गीतांचे जनक म्हणजे कवी पी. सावळाराम.
१९८० मध्ये प्रदर्शित झालेला भालू हा गीतकार म्हणून पी. सावळाराम यांचा अखेरचा चित्रपट. जनकवींच्या निधनानंतर (१९९७) त्यांचे १९५५ मध्ये लिहिलेले आणि ६७ वर्षांनी संगीतबद्ध होऊन प्रकाशित होणारे ‘कृष्ण माझा जीव’ हे पहिले गीत जनकवींच्या स्मृतींना अभिवादन करून रसिकांच्या सेवेस प्रसारित झाले आहे. या गीताला संदीप फाटक यांनी संगीतबद्ध केले असून धनंजय म्हसकर यांनी गायन केले आहे.