कामगारांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगारांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा
कामगारांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा

कामगारांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा

sakal_logo
By

शिवडी, ता. १६ (बातमीदार) ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय नायगांव अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, शिवडी यांच्या वतीने इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी व्यसनमुक्ती कार्यशाळा शुक्रवारी (ता. १४) शिवडीतील जे. कुमार कन्स्ट्रक्शनच्या मोकळ्या आवारात आयोजित करण्यात आली होती. यात नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य संघटक दिशा कळंबे यांनी कामगारांना व्यसनाचे दुष्परिणाम व आरोग्याची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान, व्यसनमुक्तीवर प्रदर्शनही लावण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बळवंत शर्मा, उषा रॉय, संदीप मान, दिनेश बोधनकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत १२० बांधकाम कामगारांनी सहभाग घेतला. या वेळी कामगारांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शिवडी केंद्राचे संचालक भाऊ नाटळकर यांनी केले होते.