फटाके विक्री मोकळ्या मैदानावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फटाके विक्री मोकळ्या मैदानावर
फटाके विक्री मोकळ्या मैदानावर

फटाके विक्री मोकळ्या मैदानावर

sakal_logo
By

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार या वर्षीही मिरा-भाईंदरमध्ये मोकळ्या मैदानांवरच फटाके विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने एकंदर वीस सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागांची निवड केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून या जागांवर फटाके विक्री करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार सार्वजनिक व खासगी मोकळ्या मैदानात फटाके विक्री परवाना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार भाईंदर पश्चिम येथील क्रॉस गार्डन, रॉयल गार्डन मैदान, सिंघानिया मैदान, म्हात्रे मैदान- नव्वद फुटी रस्ता, भाईंदर पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे मैदान, नवघर मराठी शाळा मैदान, गुप्ता मैदान, धनेश पाटील मोकळी जागा, मयेकर मैदान - जेसल पार्क, इंद्रलोक नाका, मिरा रोड येथील रेल्वे स्थानकाजवळील मासळी बाजार, शांतीनगर सेक्टर दोन मैदान, शीतल नगर गणपती मंदिर मैदान, राजू भोईर मैदान, विजय सेल्सजवळ, विजय पार्क, स्कायलाईन टॉवर - शांती पार्क, जे. पी. इन्फ्रा, मॅक्डोनाल्डसमोर, शिव ओम टॉवर या ठिकाणच्या मोकळ्या जागांचा समावेश आहे.