महिलांसाठी ‘आर्ट ऑफ लिविंग’चा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांसाठी ‘आर्ट ऑफ लिविंग’चा उपक्रम
महिलांसाठी ‘आर्ट ऑफ लिविंग’चा उपक्रम

महिलांसाठी ‘आर्ट ऑफ लिविंग’चा उपक्रम

sakal_logo
By

धारावी, ता. १६ (बातमीदार) : धारावीतील गरीब व गरजू महिलांच्या हातांना काम मिळावे, त्या आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात, या उद्देशाने श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या शक्ती प्रकल्पांतर्गत तेल विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. त्याच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम शनिवारी (ता. १५) संध्याकाळी श्री गणेश विद्या मंदिर शाळेत संपन्न झाला. संस्थेतर्फे धारावीतील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, त्यांनी आर्थिक निर्णय घेण्यात सहभागी व्हावे, यासाठी महिलांकरिता विविध योजना राबविण्यात येणार आहेत. याची सुरुवात तेलविक्रीपासून केली गेली आहे.
या कार्यक्रमाला व्यक्ती विकास केंद्राचे विश्वस्त उमाशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्रचे अपेक्स सदस्य अनिल गर्ग, श्री श्री नैसर्गिक ट्रस्टचे विश्वस्त भरत भूषण, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था प्रशिक्षक मिता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

असा आहे उपक्रम
शाळेच्या आवारात विविध तेल गाळप करणारी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. यंत्राद्वारे काढण्यात आलेले शुद्ध व ताजे तेल विक्रीसाठी महिलांना दिले जाणार आहे. तेलाची विक्री केल्यावर महिलांना वेतन न देता कमिशन दिले जाणार आहे. यातून महिलांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकेल. धारावीतील एक हजार महिलांना रोजगार व त्याचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन संस्थेने केले असल्याची माहिती आयोजक आर्ट ऑफ लिव्हिंग धारावी केंद्रप्रमुख प्रशांत व्हटकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.