मोखाड्यात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोखाड्यात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला
मोखाड्यात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला

मोखाड्यात दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला

sakal_logo
By

मोखाडा, ता. १६ (बातमीदार) : मोखाड्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी धीम्या गतीने मतदान सुरू झाले. मात्र, दुपारनंतर मतदारांनी गर्दी केली होती. यात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते; तर तालुक्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती.
मोखाड्यातील २७ पैकी २२ ग्रामपंचायतींच्या मतदानाला सकाळी संथगतीने सुरुवात झाली. २२ सरपंच पदांसाठी १०३, तर १६७ सदस्यांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. घरातली कामे आटोपल्यानंतर महिला मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती.