मालाड आणि कांदिवली पश्चिमेत दोन दिवस पाणीबाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाड आणि कांदिवली पश्चिमेत दोन दिवस पाणीबाणी
मालाड आणि कांदिवली पश्चिमेत दोन दिवस पाणीबाणी

मालाड आणि कांदिवली पश्चिमेत दोन दिवस पाणीबाणी

sakal_logo
By

मालाड, ता. १६ (बातमीदार) ः सोमवारी (ता. १७) रात्री १० ते मंगळवारी (ता. १८) रात्रीपर्यंत मालाड व कांदिवली पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. महापालिकेद्वारे मालाड (पश्चिम) विभागातील मालवणी प्रवेशद्वार क्रमांक १, राधाकृष्ण हॉटेलसमोर मार्वे मार्ग येथे नव्याने अंथरलेल्‍या आलेल्या ७५० मिलिमीटर व अस्तित्वात असलेल्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांच्या जोडणीचे व मध्यवर्ती झडप बसविण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजे सोमवारी रात्री १० वाजेपासून मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत मालाड (पश्चिम) विभागातील मढ, मालवणी, जनकल्याण नगर, मनोरी, गोराई तसेच कांदिवली (पश्चिम) या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि न्यू म्हाडा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या परिसरातील नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.