पाणजेत सोनेरी रंगाच्या कोल्ह्यांचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणजेत सोनेरी रंगाच्या कोल्ह्यांचे दर्शन
पाणजेत सोनेरी रंगाच्या कोल्ह्यांचे दर्शन

पाणजेत सोनेरी रंगाच्या कोल्ह्यांचे दर्शन

sakal_logo
By

खारघर, ता. १६ (बातमीदार) : पाणथळ, दलदल, खारफुटीमुळे उरण तालुक्यात वन्यजीवांचा वावर वाढला आहे. विविध प्रजातींच्या पक्ष्यांसोबत आता सोनेरी रंगाच्या कोल्ह्याचे दर्शन झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पाणथळ परिसरात हिवाळ्यात देशी, परदेशी पक्ष्यांची रेलचेल असते. त्यामुळे पक्षीप्रेमी तसेच विविध वर्तमानपत्रांचे छायाचित्रकार आणि पक्ष्यांवर अभ्यास करणारे तज्ज्ञ नेहमीच या परिसरात येतात. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून पाणथळ जागेत भराव केला जात असल्यामुळे वन्यजीवांचा वावर कमी झाला आहे. अशातच सोनेरी रंगाचा भारतीय कोल्हा पाणजे परिसरात निदर्शनास आला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा गोल्डन जॅकल असून भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात तो आढळतो. तसेच उरण परिसरासोबतच काही महिन्यांपूर्वी खारघर सेक्टर १७ येथील खाडीकिनारीदेखील या कोल्ह्याचा वावर असल्याचे दिसून आले होते.
-़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम
सायबेरियातून मुख्यत्वे हिवाळ्यात भारतात स्थलांतर करणारे थापट्या किंवा परी बदक. ( Northern Shoveller ) तसेच सामान्य बदक (Common Teal) मोठ्या प्रमाणात येत असून या पक्ष्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी येत आहेत.
़़़़़़़़़़-़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
रविवारी सकाळी पाणजे पाणथळ परिसरात पक्षी निरीक्षण करीत असताना खाद्याच्या शोधात कुत्रे आले असावे, असे वाटले. मात्र, अशा प्रकारचे कुत्रे नसल्याचे लक्षात आल्यावर झाडाच्या आड उभे राहून निरीक्षण केले असता तो सोनेरी रंगाचा कोल्हा असल्याचे निदर्शनास आले.
- पराग घरत, पर्यावरणप्रेमी