‘गीत-ओ-गझल की सरीता हमारी लता’ संगीत कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गीत-ओ-गझल की सरीता हमारी लता’ संगीत कार्यक्रम
‘गीत-ओ-गझल की सरीता हमारी लता’ संगीत कार्यक्रम

‘गीत-ओ-गझल की सरीता हमारी लता’ संगीत कार्यक्रम

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः फालिसा एन्टरटेन्मेंटने शुक्रवारी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या ‘गीत-ओ-गझल की सरीता हमारी लता’ या सांगीतिक सोहळ्यात स्वर्गीय गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुमधुर गाण्यांचा स्वर घुमला. या सोहळ्यात लतादीदींचा ९३ वा जन्मदिवस साजरा करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सायनमधील षण्मुखानंद हॅालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘गीत-ओ-गझल की सरिता हमारी लता’ या कार्यक्रमाला महान गायिका उषा मंगेशकर, अभिनेता राज बब्बर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि अभिनेत्री पूनम धिल्लन आदी कलाकार उपस्थित होते. सुदेश भोसले, बेला शेंडे, प्रतिभा सिंग बाघेल, उस्ताद सिराज खान आणि फारूख शेख या गायक-कलाकारांनी या कार्यक्रमात ५० संगीतकारांसोबत सहभाग घेतला.