कागदाचे काळीज करून लेखन करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागदाचे काळीज करून लेखन करा
कागदाचे काळीज करून लेखन करा

कागदाचे काळीज करून लेखन करा

sakal_logo
By

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : कागदाचे काळीज करून लेखन करा, असा मार्गदर्शक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी रसिक-वाचकांना कल्याणमधील एका कार्यक्रमात दिला. कल्याण पश्चिममधील सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांना अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘वाचन संस्कृती संवर्धन २०२२’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. लेखक धनाजी जनार्दन बुटेरे लिखित ‘उद्धवस्त फुलांची बाग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी संपूर्ण कुटुंबासमवेत सार्वजनिक ठिकाणी वाचन उपक्रम राबविणाऱ्या विशाल वसंत कदम यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सन्मानही प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
अनेक दशके वाचनसंस्कृती अबाधित राखणारे वाचनालयाचे ज्येष्ठ-श्रेष्ठ वाचक अंजली मेहंदळे, डॉ. चंद्रशेखर देशपांडे, रमेश पटवर्धन यांना सन्मानित करण्यात आले.