लटके पदवीधर; तर पटेल नववी पास ं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लटके पदवीधर; तर पटेल नववी पास
ं
लटके पदवीधर; तर पटेल नववी पास ं

लटके पदवीधर; तर पटेल नववी पास ं

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण २५ उमेदवारांपैकी १४ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले; परंतु मुख्य लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यातच होणार आहे. या दोघांचीही प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार लटके या पदवीधर असून पटेल हे केवळ नववी पास आहेत, तर एकूण संपत्ती आणि कर्जाच्याबाबतीत पटेल हे लटके यांच्यापेक्षा सरस असल्याचे प्रतिज्ञापत्रातील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
विधानसभेच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवर नजर टाकल्यास शैक्षणिक पात्रता, स्थावर आणि जंगम मालमत्ता तसेच कर्जाच्या बाबतीत दोन्ही उमेदवारांमध्ये चढाओढ असल्याचे दिसते. लटके या वाणिज्य शाखेतील पदवीधर आहेत, तर मुरजी पटेल हे नववी पास आहेत. जंगम मालमत्तेच्या बाबतीत लटके यांच्यापेक्षा पटेल सरस आहेत. लटके यांच्याकडे एकही वाहन नाही; पण मुरजी पटेल यांच्याकडे मात्र दोन कार आहेत. कर्जाच्या बाबतीतही पटेल हे लटकेंपेक्षा आघाडीवर आहे.
----
ऋतुजा लटके
- फौजदारी गुन्हे - कोणताही नाही
- बँक ठेवी - रोख ७५ हजार, बँकेतील ठेवी ३.०६ लाख, शेअर्स ५.९८ लाख, दागिने - ११ लाख
- जंगम मालमत्ता - ४३.८९ लाख
- स्थावर मालमत्ता - ५१ लाख (रमेश लटके - ८.०३ कोटी)
- कर्ज - १५.२९ लाख (रमेश लटके - २.०४ कोटी)
- शिक्षण - बी.कॉम
----
मुरजी पटेल
- फौजदारी गुन्हे - कोणताही नाही
- बँक ठेवी - रोख १.०५ लाख, पत्नीच्या नावे बँकेतील ठेवी ५० हजार ४११
- वाहन - टोयोटा इनोव्हा
- दागिने, किसान विकास पत्रे - ६३.९७ लाख
- एकूण मालमत्ता - ५.४१ कोटी
- शिक्षण - नववी उत्तीर्ण