दिवा उपशहर प्रमुखपदी सचिन पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवा उपशहर प्रमुखपदी सचिन पाटील
दिवा उपशहर प्रमुखपदी सचिन पाटील

दिवा उपशहर प्रमुखपदी सचिन पाटील

sakal_logo
By

दिवा, ता. १६ (बातमीदार) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह मशाल निश्चित झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला, नवीन पदांसाठी निष्ठावंतांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे दिवा उपशहर प्रमुखपदी सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिवा विभागातील साबे गाव येथील सचिन पाटील यांनी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार असल्याचा जाहीर पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर आता माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शिफारशीनुसार त्यांना दिवा शिवसेना उपशहर प्रमुखपदी निवड केली आहे. तसेच शहर संघटक प्रियांका सावंत (दिवा प्रभाग क्र. २७), योगिता नाईक (दिवा प्रभाग क्र. २८) यांचीही त्या वेळी निवड केली आहे. सचिन पाटील हे गेली २० वर्षे शिवसेनेत काम करीत आहेत.