उमरोळीत पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मतदान सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमरोळीत पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मतदान सुरळीत
उमरोळीत पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मतदान सुरळीत

उमरोळीत पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मतदान सुरळीत

sakal_logo
By

पालघर, ता. १६ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील उमरोळी ग्रामपंचायतीमध्ये मतदान केंद्रावर दोन गटांत वादावादी झाली, पण पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. पालघर तालुक्यात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्यामध्ये सकाळपासून ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पालघर तालुक्यातील केळवे येथील तीन मतदान केंद्रांवर; तर सफाळे, वेडी कोळगाव आदी ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले.
सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये मतदारांची मतदान केंद्रांवर कमी गर्दी होती, पण दुपारनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागण्यास सुरुवात झाली. यात महिला, वयोवृद्धही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर येताना दिसले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील स्थानिक पोलिस यंत्रणा व इतर यंत्रणा कडेकोट बंदोबस्तात सज्ज होती.
केळवे भरणे पाडा या मतदान केंद्रावर एका महिलेने मतदान करण्यापूर्वीच इतर कोणीतरी मतदान केल्याचे समोर आले. त्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे मतदान केंद्र अधिकारी यांनी संबंधित महिलेचा अर्ज भरून तिला पुन्हा मतदान करण्याची संधी दिली. मात्र नक्की या मतदान केंद्रावर काय घडले याची सविस्तर माहिती समजू शकली नाही.