व्यापाऱ्याला मारहाण करीत मागितली खंडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापाऱ्याला मारहाण करीत मागितली खंडणी
व्यापाऱ्याला मारहाण करीत मागितली खंडणी

व्यापाऱ्याला मारहाण करीत मागितली खंडणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : दोन लाखाची व्यवस्था कर, नाही तर ढगात पाठवेन, अशी धमकी दिली; तरीही व्यापाऱ्याने खंडणी न दिल्याने त्याला पाच ते सहा जणांनी मारहाण करीत, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात रवी दाढी, किरण दाढी, सॅम खांडे, बबल्या ऊर्फ कृष्णा माळी व त्यांचे तीन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात व्यापारी सुरेश काळे (वय ४०) राहण्यास आहेत. त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रात्री ते कल्याणमधील हॉटेलमध्ये बसले असताना तेथे आरोपींनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. ते न दिल्याने किरण दाढी याने त्याच्या इतर साथीदारांस मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवण्यास सांगत व्यापारी सुरेश यांना मारहाण केली व झालेला प्रकार कोणास सांगितला; तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपींनी दिली असल्याचे तक्रारदार सुरेश यांनी म्हटले आहे. व्यापाऱ्यांचे अपहरण, खंडणी मागणे यांसारख्या घटना कल्याण डोंबिवलीत वारंवार घडत असून खंडणी टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली असल्याची चर्चा होत आहे.