एअरलाईन्समध्ये काम देण्याच्या बहाण्याने ३ लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एअरलाईन्समध्ये काम देण्याच्या बहाण्याने ३ लाखांचा गंडा
एअरलाईन्समध्ये काम देण्याच्या बहाण्याने ३ लाखांचा गंडा

एअरलाईन्समध्ये काम देण्याच्या बहाण्याने ३ लाखांचा गंडा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १६ : इंडिगो एअर लाईन्स कंपनीत काम देण्याचे प्रलोभन दाखवत डोंबिवलीतील ३० वर्षीय तरुणाची ३ लाख १८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर रोड परिसरात प्रदीप कनोजिया (वय ३०) राहण्यास असून ते खासगी नोकरी करतात. त्यांच्या मोबाईलवर एका नंबर वरून संदेश आला. अंजली शर्मा बोलत असल्याचे सांगत इंडिगो एअरलाईन्स या कंपनीतून बोलत असल्याचे सांगत कंपनीमध्ये काम देण्याच्या बहाण्याने प्रदीप यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी गुगल पेद्वारे ३ लाख १८ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. १६ एप्रिल ते ३ जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला. मात्र अद्याप नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रदीप यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.