पारितोषिक वितरण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारितोषिक वितरण सोहळा
पारितोषिक वितरण सोहळा

पारितोषिक वितरण सोहळा

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः ‘सकाळ’ आणि परिवर्तन संस्था डॉ. राजू वाघमारे आयोजित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि नवरात्र नवरंग पैठणी स्पर्धा विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दामोदर नाट्य सभागृह, परेल येथे आयोजित केला आहे. घरगुती गणपती स्पर्धेतील विजेत्यांनी सहपरिवार आणि नवरात्र स्पर्धेतील विजेत्यांनी आपल्या ग्रुपसोबत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या वेळी उदय साटम आयोजित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या नृत्य संगीताचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. लवकरच सर्व विजेत्यांना या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’कडून संपर्क साधला जाईल. अधिक माहितीसाठी राजेश ८८८८८६१३०६ यांच्याशी संपर्क साधावा.