कल्याण ग्रामीण मधील उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण ग्रामीण मधील उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश
कल्याण ग्रामीण मधील उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश

कल्याण ग्रामीण मधील उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : कल्याण ग्रामीण परिसरातील सागाव चिरागनगर भागात उत्तर भारतीय नागरिकांची मोठी वस्ती आहे. सागाव परिसरात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. शिवसनेतील दुफळीनंतर उत्तर भारतीयांना आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी शिंदे व ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू असतानाच उत्तर भारतीयांनी शनिवारी मनसेचे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सागांव येथून शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील घडामोडींनंतर शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटाकडून या भागातील उत्तर भारतीयांना आपल्या गटात खेचण्यासाठी, येथील आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्षातील हा अंतर्गत कलह आणि श्रेयवाद याला कंटाळून येथील उत्तर भारतीय तरुणांनी शनिवारी मनसेत प्रवेश केला. हिंदुत्वाचा जयजयकार करत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या विकासकामांमुळे आम्ही मनसेत प्रवेश करत असल्याचे या वेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर भारतीय नागरिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे कटिबद्ध असेल, असे या वेळी अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले. उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी किशोर महावर, मनोज सिंग, राजकुमार सिंग, संदीप पांडे, पवन शुक्ला, अजित चौबे यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.