राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उरणमध्ये पथसंचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उरणमध्ये पथसंचलन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उरणमध्ये पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उरणमध्ये पथसंचलन

sakal_logo
By

उरण, ता. १६ (वार्ताहर)ः हिंदूंची सर्वात मोठी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांना सुपरिचित आहे. संघाच्या एकूण महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी पथसंचलन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. उरण तालुक्यात रविवारी संघ सदस्यांनी पथसंचलन केले.
उरण शहरातील देऊळवाडी येथील संघ स्थानातून या पथसंचलनाला सुरुवात झाली. हे पथसंचलन देऊळवाडी, गणपती चौक - राजपाल नाका- चारफाटा-बालई- बाजारपेठ - राजपाल नाका, स्वामी विवेकानंद चौक, एन. आय. हायस्कूल मार्गे परत मूळ स्थानी परत आले. या वेळी ७३ स्वयंसेवकांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. या उपक्रमातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उरण तालुका कार्यवाह दर्शन पाटील, सहकार्यवाह भरत पाटील, मुख्य शिक्षक- गोपाल प्रजापती, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीपाद कातरणे, जिल्हा कार्यालयप्रमुख स्वप्नील रावते, जिल्हा महाविद्यालयीनप्रमुख पुष्कर सहस्रबुद्धे, व्यवस्थाप्रमुख पुरुषोत्तम सेवक, भारतीय जनता पार्टीचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक राजू ठाकूर, उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुहास चव्हाण, सहा. पोलिस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलिस कर्मचारी-युवराज जाधव उपस्थित होते.