रेल्वेस्थानकाच्या फलाटावर ऑटोरिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेस्थानकाच्या फलाटावर ऑटोरिक्षा
रेल्वेस्थानकाच्या फलाटावर ऑटोरिक्षा

रेल्वेस्थानकाच्या फलाटावर ऑटोरिक्षा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कुर्ला रेल्वेस्थानकाच्या फलाटावर ऑटोरिक्षा नेल्याचा प्रकार १२ ऑक्टोबर रोजी समोर आला. पोलिसांकडून ही रिक्षा जप्त करण्यात आली असून चालकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

लोकल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी रोजच पाहायला मिळते; पण मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर रात्री १ वाजता एक रिक्षा (क्रमांक ०२ सीटी २२४४) आल्याचे पाहायला मिळाले. रिक्षा येताच प्रवाशांनी आरडोओरड केली. त्यामुळे रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ही रिक्षा जप्त करण्यात आली. तसेच चालकाला अटक करण्यात आली. यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. पण, याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, जेव्हा अशा प्रकारचा व्हिडीओ किंवा फोटो प्रवाशांकडून पोस्ट केला जातो तेव्हाच रेल्वे प्रशासनाला जाग का येते, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. इतर रेल्वे स्थानकांवरदेखील प्रवाशांना आपल्याकडे खेचण्यासाठी रिक्षाचालकांची अशीच स्पर्धा लागलेली असते. त्याचा त्रास प्रवाशांनाही होतो. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.