सहा आठवड्यात भूमिका स्पष्ट करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा आठवड्यात भूमिका स्पष्ट करा!
सहा आठवड्यात भूमिका स्पष्ट करा!

सहा आठवड्यात भूमिका स्पष्ट करा!

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः दिवंगत उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघाताची मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी शुक्रवारी (ता. १४) उपस्थित होते. या वेळी अपघातासंदर्भात सहा आठवड्यांत भूमिका मांडण्याचे आदेश आयोगाने दिले.
सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर वाहनांमध्ये सुरक्षेच्या यंत्रणेचे विविध मुद्दे पुढे आले. चालकांसह मागे बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट अनिवार्य करण्याचीही बाब पुढे आली. त्यातच आता मानवाधिकार आयोगानेही दखल घेत या अपघातातील चुकांची विचारणा केली आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरला परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच अपघाताबाबत सहा आठवड्यात खुलासा सादर करण्याच्या सूचना मानवाधिकार आयोगाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.